केज (रिपोर्टर)ः- शासकीय कर्मचार्यांचा गेल्या दोन दिवसापासून संप सुरू आहे. त्यामुळे कार्यालयात एकही कर्मचारी फिरकत नाही. कर्मचारी अभावी तालुक्याचे सर्वच कार्यालय ओस पडले असल्याचे दिसून येत आहे. नागरीकांची विविध कामे बंद मुळे खोळंबून पडली आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी कर्मचार्यांनी 14 तारखेपासून बेमुदत संप पुकारलेला आहे. संपाचा आजचा तिसरा दिवस आहे. कर्मचारी संपावर असल्याने सर्वच शासकीय कार्यालय ओस पडली आहे. नागरीकांची विविध कामे कार्यालयामध्ये असतात. बंदमुळे नागरीकांची कामे खोळंबून पडली आहे. तालुक्यातील आरोग्य व्यवस्था पुर्णपणे ठप्प झाल्याने रुग्ण खाजगी रुग्णालयात जावू उपचार घेतांना दिसून येत आहे.