केज (रिपोर्टर) केज बसस्थानकामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून नव्वद वर्षाची वयोवृद्ध महिला पडून आहे. या महिलेला कोणी नातेवाईक आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत असून सदरील महिलेची सेवा करण्याचे काम सफाई कामगार करत आहेत. या महिलेस निराधार केंद्रामध्ये आधार देण्याची गरज आहे. तरी सामाजिक कार्यकर्त्यांनी महिलेस आधार द्यावा.
नव्वद वर्षांची वयोवृद्ध कावेराबाई गणपत पांचाळ ही महिला केजच्या बसस्थानकामध्ये तीन महिन्यांपासून पडून आहे. वयोमानानुसार तिला जास्त हालचाल करता येत नाही. प्रवासी जे देतील ते खाऊन ती आपली उपविजिविका भागवत आहे. तिला कोणी नातेवाईक आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तीन महिन्यात तिच्याकडे कोणीही फिरकला नाही. बसस्थानकातील सफाई कामगार शेख खुदबोद्दीन हे या महिलेची सेवा करत असल्याचे दिसून येत आहे. या महिलेला निराधार केंद्रामध्ये दाखल करण्याची गरज आहे. ही महिला तालुक्यातील कानडीमाळी येथील असल्याचे सांगण्यात येते.