बीड (रिपोर्टर): अनोळखी इसमाने फोन करून तुम्हाला स्वस्तात स्विप्ट डिझायर गाडी देतो असे म्हणून वेळोवेळी ऑनलाईन 1 लाख 13 हजार 99 रुपये घेवून एकाची फसवणूक केली. पैसे घेवूनही गाडी मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे गाठून अज्ञात भामट्याविरोधात तक्रार दिली. सुनिल प्रभुअप्पा मिसाळ (वय 58) यांना अनोळखी इसमाने फोन करून तुम्हाला स्वस्तात स्विप्ट डिझायर गाडी देतो असे आमीष दाखवले व त्यासाठी काही रक्कम फोनवर पाठविण्याचे सांगितले, त्यावर विश्वास ठेवून मिसाळ यांनी त्याला वेळोवेळी पैसे पाठविले मात्र गाडी मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावरून त्यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्याविरोधात तक्रार दिली. त्यावरून पोलीसात कलम 420 भादवि गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पो.नि. पवार हे करत आहेत.