आष्टी पोलिसात गुन्हा दाखल
बीड (रिपोर्टर): इंस्टाग्रामरुन एका तरुणीशी ओळख करुन तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत नंतर ब्लॅकमेल करुन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पिडितेच्या फिर्यादीवरुन आष्टी पोलिसात एका तरुणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामखेड येथील एका तरुणीचे दैंड (पुणे) येथील आशिफ राजु शेख या तरुणाशी गेल्या दोन वर्षापूर्वी इंस्टाग्रामवर ओळख झाली त्या तरुणानी तील आपल्या प्रमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर इस्ट्रग्रामच्या माध्यमातून तरुणीचे काही फोने त्याने आपल्याकडे घतले. व ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तीला ब्लॉकमेल करणे सुरु केले. ब्लॅकमेल करुनच तिला आष्टी तालुक्यातील एका लॉजवर नेले व तीथे तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी आष्टी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.