बीड (रिपोर्टर) देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे हुकुमशाही राजवट लादू पाहत आहेत, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा वाढता प्रभाव पाहून भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी केलेले विविध घोटाळे राहुल गांधी मुद्देसुद बाहेर काढू लागलेत म्हणून त्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांची खासदारकी रद्द केली मात्र काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता, नेता यासह आता सर्वसामान्य माणूसही पेटून उठला आहे. भाजपाच्या निषेधार्थ बीड येथे आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी पुतळ्यासमोर सत्याग्रह आंदोलन केले.
खा. राहुल गांधी यांच्या संसद सदस्यपद रद्द केल्याच्या निषेधार्थ देशामध्ये भाजपाचा निषेद नोंदवला जात आहे. बीडमध्ये आज ओबीसीचे जिल्हाध्यक्ष प्रा. संभाजी जाधव यांच्या नेृत्वाखाली सकाळी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. या वेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष परवेज कुरेशी, अॅड. विद्या गायकवाड, तालुकाध्यक्ष रमेश सानप, अॅड. गणेश करांडे, गोविंद साठे, अमोल पाठक, शामसुंदर जाधव, विष्णू मस्के, कानिफनाथ विघ्ने, मोहसीन शेख, अमजद कुरेशी, परवेज पठाण, सय्यद मसियोद्दीन यांच्यासह आदींची उपस्थिती होती.