केज (रिपोर्टर): आक्षेपार्ह्य विधान केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याची सुनावणी केज कोर्टात असल्याने जामीनासाठी आज माजी खा.निलेश राणे हे केजमध्ये केज न्यायालयात दाखल झाले. न्यायालयासमोर हजर झाल्यानंतर 20 हजाराच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. निलेश राणे यांच्यावर दोन समाजात जातीय तेढ निर्माण केल्याचा ठपका होता. निलेश राणे आज कोर्टात हजर राहिले नसते तर त्यांच्याविरूद्ध अटक वॉरंट निघाले असते. आजच्या जामीनादरम्यान पुढील तारखेस निलेश राणे यांना कोर्टात हजर राहण्याबाबत अट घालण्यात आली आहे.
याबाबत अधिक असे की, निलेश राणे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची बदनामी केली होती. त्याचबरोबर दोन समाजामध्ये तेढ निर्माण केले होते म्हणून त्यांच्या (पान 7 वर)
विरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी गेल्या काही दिवसांपासून केज न्यायालयात सुरू होती. राणे सातत्याने गैरहजर असल्याने त्यांच्याबाबत अटक वॉरंट निघण्याची शक्यता असल्याने आज निलेश राणे हे जामीनासाठी केज न्यायालयासमोर हजर झाले. यापूर्वी अंबाजोगाई जिल्हा न्यायालयाने 20 हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर जी जामीन दिली होती त्याच जातमुचलक्यावर आज केज न्यायालयाने जामीन कायम ठेवली. निलेश राणे हे कोर्टात येणार असल्याने न्यायालय परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फिर्यादीच्या वतीने सतीश मस्के यांनी काम पाहिले तर निलेश राणे यांच्यावतीने अॅड.महादेव तपसे यांनी काम पाहिले.
आम्ही काही गांधीवादी नाही – निलेश राणे
सध्या राजकारणामध्ये कोणता राजकीय नेता कोणावर काय टीका करेल हे सांगता येत नाही मात्र यावरच निलेश राणे यांना प्रश्न विचारतात निलेश राणे मनाली की जर आम्हाला कोणी बोललं तर आम्ही त्याला शंभर टक्के बोलूच आम्ही काही गांधीवादी नाही असे म्हणून यापुढे जे कोणी आमच्या अंगावर येईल आम्ही पण शांत बसणार नाही असं निलेश राणे म्हणाले केज मध्ये एका केज च्या संदर्भात कोर्टामध्ये हजेरी लावण्यासाठी आज निलेश राणे आले होते त्यावेळी ते बोलत होते. सुषमा अंधारे या माझ्यापेक्षा तीन वर्षांनी लहान आहेत तरीसुद्धा त्या आमच्याबद्दल कसे बोलतात हे सगळ्यांना माहित आहे त्यांनी सुद्धा बोलण्यावरती नियंत्रण ठेवावं त्यामुळे शिरसाट त्यांच्याबद्दल काय बोलले हे मला माहित नाही पण त्यांनी सुद्धा आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा असं मला वाटतं