बीड (रिपोर्टर)ः- पळून जाण्याचे प्रकार सध्या वाढले आहे. जिल्ह्यातल्या विविध पोलीस ठाण्यात दररोज मिसींगच्या तक्रारी दाखल होतात.काल पुणे आणि नगर येथून चौघां जणांना ताब्यात घेण्यात आले. शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तिन महिन्यात मिसींगच्या तक्रारी दाखल झालेल्या आहे.
बीड जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यामध्ये दररोज पळून जाण्याच्या अनेक तक्रारी दाखल होत असतात. पळून जाणार्या मध्ये काही अल्पवयीन मुली असतात. शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गेल्या तिन महिन्यात 26 मिसींगच्या तक्रारी दाखल झालेल्या आहे. काही जणांना शोधण्यात पोलीसांना यश आले आहे. काल नगर येथे एका तरुण आणि तरुणींना पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात येते. त्याच बरोबर पुणे येथूनही प्रेम युगलांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.