बीड (रिपोर्टर) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त नगर समाजातील मान्यवरांचा सत्कार सोहळा शिवसंग्रामने आयोजीत केला. या सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सोहळ्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, अभिनेत्री ईशा केसकर यांची उपस्थिती प्रमुख होती.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शिवसंग्रामने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्या दरम्यान व्यासपीठावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, शिवसंग्रामचे सर्वेसर्वा विनायक मेटे, ‘जयमल्हार’ मालिकेतील अभिनेत्री ईशा केसकर, प्रभाकर कोलंगडे, नारायण काशीद, मनसेचे अशोक तावरे, जि.प. सदस्य बप्पासाहेब तळेकर, अनिल घुमरे, सुहास पाटील, राहील मस्के यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या धनगर समाजातील मान्यवरांचा हा सत्कार सोहळा संपन्न झाला. समाजातील विविध क्षेति काम करणार्या आणि यश संपादन करणार्यांचे सन्मान शिवसंग्रामने केला. या वेळी अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र वेळेअभावी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि शिवसंग्रामचे सर्वेसर्वा आ. विनायक मेटे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
नाट्यकार्य शाळा सुरू करा -ईशा केसकर
‘जयमल्हार’ मालिकेमध्ये काम करणार्या अभिनेत्री ईशा केसकर यांनी शिवसंग्रामच्या नेत्यांसह सर्व पदाधिकार्यांचे कौतुक केले. जयमल्हार मालिकेने मला जे प्रेम दिले ते कुठेही मिळाले नाही, असे सांगत हा कार्यक्रम नाट्यगृहात असल्याने मी सुरुवातीच्या काळात नाटके करायचे. नाटकांना अधिक प्राधान्य द्यायला हवे, त्यासाठी माझी विनंती आहे, हे सर्व कलाप्रेमी आणि नाट्यप्रेमी दिसून येतात, बीडमध्ये नाट्यकार्य शाळेचे आयोजन करावे.
येणार्या काळात मेटेंना मोठी संधी
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच शिवसंग्रामचे माजी जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे यांनी व्यासपीठावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासमोर आपल्या नेतृत्वाची व्यथा मांडली. परिस्थितीची मांडणी करताना कोलंगडे म्हणाले की, ‘दरेकर साहेब, आम्ही मेटे साहेबांवर अन्याय झाला, असे म्हणणार नाही मात्र येणार्या काळात मोठी संधी आहे, असे आम्ही म्हणूत.