बीड (रिपोर्टर) लहान मुलांच्या किरकोळ भांडणावरून दोन गटात आज दुपारी चांगलीच हाणामारीची घटना तांदळवाडी भिल्ल या ठिकाणी घडली. या प्रकरणातील दोन्ही गटातील सात ते आठ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अर्जुन केदार आणि बाळू फड यांच्यामध्ये लहान मुलांच्या भांडणावरून वाद निर्माण झाला. हा वाद विकोपाला गेला. दोन्ही गटातील एकमेकांनी लाठ्या काठ्यांनी हल्ला चढवला. यात आकाश केदार, राजेंद्र केदार, अर्जुन केदार, नामदेव सानप, लक्ष्मण सानप यांच्यासह आदी जण जखमी झाले आहेत. त्यांच्या उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती आ. संदीप क्षीरसागरांना झाल्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयात जावून जखमींची आस्थेवाईक चौकशी केली. या वेळी वैजिनाथ तांदळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांची उपस्थिती होती.