मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला सन्मान
मुंबई (रिपोर्टर) नगरविकास दिनानिमित्त नगरविकास विभागाच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकर पुरस्कार नगररचना विभागाचे कोकण विभागाचे सहसंचालक जितेंद्र लक्ष्मण भोपळे यांना प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जितेंद्र भोपळे हे बीडचे भूमिपुत्र आहेत. त्यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
एनसीपीए येथे हा सोहळा पार पडला. या वेळी मंत्रालय (खुद्द) 5 आणि क्षेत्रीय स्तर तांत्रीक 17 व क्षेत्रीयस्तर (अतांत्रिक संवर्ग) 8, असे एकूण 30 पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्य सरकारने अनेक विकास प्रकल्पांना गती दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनियुक्तीवर गेलेल्या अधिकारी व कर्मचार्यांनी शहराविषयी आस्था व जिव्हाळा ठेवून काम केले पाहिजे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुरस्कार वितरण प्रसंगी म्हणाले. दरम्यान, जितेंद्र भोपळे हे मुळचे बीडचे आहेत. त्यांना सन्मानाचा हिरोजी इंदुलकर क्षेत्रीय पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.