टार्गेट 1760 कोटींचं
बीड (रिपोर्टर) दरवर्षी खरीप हंगामामध्ये शेतकर्यांना जिल्हा मध्यवर्तीय बँकेसह राष्ट्रीयकृत बँकेकडून पीक कर्जाचे वाटप होते. पीक कर्ज वाटप करताना अगदी संथगतीने वाटप होत असल्याने शेतकर्यांना तितका फायदा पीककर्जाचा मिळत नाही. आतापर्यंत फक्त 243 कोटीच कर्जाचे वाटप झाले. उद्दिष्ट 1760 कोटींचे आहे.
बीड जिल्ह्यामध्ये दरवर्षी पीक कर्जाच्या बाबतीत अनेक तक्रारी असतात. काही बँका शेतकर्यांना वेळेवर कर्जाचे वाटप करत नाहीत तर काही बँकेचे अधिकारी शेतकर्यांची विविध कागदपत्रांवरून अडवणूक करून कर्ज वाटप करण्यास विलंब लावतात. बीड जिल्ह्यात काही ठिकाणी चांगला पाऊस पडल्यामुळे शेतकर्यांनी पेरणीपुर्व मशागतीला सुरुवात केली. बी-बियाणे खरेदी करण्यासाठी पैशाची गरज असते. बियाणे खरेदी करण्यासाठी पीक कर्जाचे वाटप केले जाते. जिल्ह्यासाठी यंदा 1760 कोटी रुपयांचे टार्गेट देण्यात आले असून आतापर्यंत फक्त 443 कोटी 72 लाख रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. कर्जाची टक्केवारी 13.85 इतकी आहे.