बीड (रिपोर्टर)- प्रस्थापितांनी गेल्या 40 वर्षापासून बीड कृषी उत्पन्न बाजार समितीला देशोधडीला लावले असून, बळीराजाच्या हक्काचा पैसा स्वतःच्या उपभोगासाठी करून घेऊन बळीराजाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्या या प्रस्थापितांचा नामशेष मतदार राजांनी केला असून आता बीड कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्डचे नामकरण करणे गरजेचे असून यापुढे छत्रपती श्री.शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती बीड या नावाने ओळखली जावी अशी मागणी बीड मतदार संघातील बळीराजांनी केली असून आ.संदीप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डला छत्रपती श्री.शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे असे निवेदनाद्वारे नवनिर्वाचित सभापती सौ.सरला मुळे आणि उपसभापती शामभाऊ पडुळे यांच्याकडे केली. आज कृषी उत्पन्न बाजार समिती पहिल्या बैठकी प्रसंगी आ.संदीप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, जिल्हाप्रमुख अनिल जगताप व शिष्ट मंडळाने निवेदनाद्वारे बीड कृषी उत्पन्न बाजार समितीला छत्रपती श्री. शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती बीड असे नाव देण्यात यावे अशी मागणी केली.
बीड मतदार संघातील बळीराजांनी इतिहास घडवत प्रस्थापितांच्या चाळीस वर्षाच्या जाचातून मुक्त करत शेतकरी परिवर्तन आघाडीच्या पंधरा उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी केले असून, प्रस्थापितांचा काळा इतिहास पुसण्यासाठी छत्रपती श्री. शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज असुन या नावाला शोभेल असे काम येत्या पाच वर्षात नवनिर्वाचित संचालक मंडळ करणार छत्रपती श्री.शिवाजी महाराज कषी उत्पन्न बाजार समितीचे नाव महाराष्ट्र भर नावाजले जाईल अशा विकास कामाची चादर टाकली जाणार आहे. निवेदन देताच संचालक मंडळाने ठराव संमत करून मान्य केला. संचालक मंडळाने यावेळी विविध मुद्द्यावर चर्चा करत अनेक ठराव मंजूर केले आहेत. यावेळी सभापती सरलाताई मुळे उपसभापती शामभाऊ, पडूळ यांच्या सह नवनिर्वाचीत संचालक चव्हाण बळीराम बापुराव,जोगदंड प्रभाकर यादवराव, झोडगे शरद दिगांबरराव, पैठणे उद्धव मनोहर, माने संजय मारोती, लांडे आदिनाथ बाबासाहेब, काळकुटे ज्ञानेश्वरी सचिन, माने सुभद्रा सखाराम, आखाडे विश्वास तात्यासाहेब, फड नितीन शिवाजीराव, गुंदेकर धनंजय आसाराम काळे दिपक गणपतराव, उगले गणेश बाबासाहेब सह शेतकरी, कार्यकर्ते आदी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.