डुकराच्या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी
लिंबारुई येथे घडली आज सकाळी घटना
कुत्रे मागे लागल्याने डुक्कर घरात घुसले
बीड (रिपोर्टर) ग्रामीण भागासह शहरी भागात डुकरांचा उपद्रव वाढला आहे. शेतातील पिकांची डुकरे मोठ्या प्रमाणात नासाडी करतात. आतापर्यंत अनेक शेतकर्यांवर डुकरांनी हल्ला केला आहे. आज सकाळी लिंबारुईदेवी येथील एका घरात घुसून डुकराने वयोवृद्धाचा चावा घेतल्याने यात ते गंभीररित्या जखमी झाले. कुत्रे मागे लागल्यामुळे डुक्कर थेट घरात घुसले असल्याचे सांगण्यात आले.
ग्रामीण भागात डुकरांचा वावर वाढला. डुकरं शेतातील पिकांची नासाडी करतात. डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी सतत मागणी नागरिकातून केली जात असली तरी याकडे मात्र प्रशासन दुर्लक्ष करत आहे. आज सकाळी लिंबारुई देवी येथे डुकराच्या मागे कुत्रे लागल्याने डुक्कर थेट बाबासाहेब नांदे यांच्या घरात घुसले. या वेळी डुकराने त्यांच्या पायाला चावा घेतला. यात ते गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.