मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कॅबिनेटच्या महत्वपूर्ण बैठकीत निर्णय
मुंबई (रिपोर्टर): मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगर येथे उभारणार असल्याचे सांगत या स्मारकासाठी शंभर कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली असून भामा आस्खेड प्रकल्पाचे कालवे रद्द करण्याची घोषणा करत राज्यात सातशे ठिकाणी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ यासाठी 210 कोटींची मान्यता देण्यात आली आहे.
मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत राज्यभरात सातशे ठिकाणी स्वस्तात उपचार करणारे ‘आपला दवाखाना’ उभारला जाणार आहे. मुखेड, उमरखेड, चिखलदरा, महाड, हार्सूळ, वरुड, फलटण या ठिकाणी न्यायालयाची स्थापना केली जाणार असल्याचे सांगत भुखंड हस्तांतरणातील अनर्जित रकमेसाठी सुधारीत धोरण आखण्यात आल्याचे सांगण्यात येते. पुर प्रतिबंधासाठी राज्यातील 1 हजार 648 कि.मी.च्या नद्यांमध्ये गाळ काढला जाणार असल्याचेही आजच्या बैठकीत ठरले असून असंघटीत कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापले जाणार आहे. संजय गांधी श्रावणबाळ योजनातील निवृत्ती वेतनात भरीव वाढ करण्यात आली असून महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रित करून दोन कोटी कार्ड वाटले जाणार आहेत. आता 5 लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण मिळणार आहे. यासह अन्य महत्वाचे निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आले आहेत.