परळी : (रिपोर्टर) गुत्तेदार असलेला एका चाळीस वर्षीय व्यक्तीचा आज सकाळी परळी ते अंबाजोगाई रस्त्यावरील कर्हेवाडी शिवारात्री त्याच्या प्लॉट मध्ये आढळुन आल्याने एकच खळबळ झाली उडाली. घात-पाताचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेहरकर यांच्या सह परळी पोलीस दाखल झाली आहे.
आत्माराम उर्फ बंडू मुंडे (वय 40 वर्ष राहणार कर्हेवाडी ता.परळी) असे मृतदेह आढळून आलेल्या गुत्तेदाराचे नाव आहे. आज सकाळी ते परळी अंबाजोगाई रस्त्यावरील कर्हेवाडी शिवारात त्यांच्या प्लॉट मध्ये गेले होते. दुपारी त्यांचा मृतदेह आढळुन आलेले एकच खळबळ उडाली. नागरीकांनी पोलीसांना माहिती देताच परळी पोलीसांसह अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेहरकर घटना स्थळी दाखल झाल्या होत्या. प्रथमदर्शी घातपताचा संशय व्यक्त केला जात आहे. आत्माराम मुंडे दोन दीवसा पासून बेपत्ता होते. या बाबत परळी पोलीसाद मिसिंग दाखल आहे.