बीडमध्ये व्यवसायिकाने तर परळीत तरुणाने जिवन संपविले
बीड/परळी (रिपोर्टर): शहरातील माळीवेस भागात असलेल्या सलून व्यवसायिकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सदरील या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. दुसरी आत्महत्येची घटना परळी तालुक्यातील भोपळा येथे घडली. येथील एका तरुणाने फाशी घेऊन आपले जीवन संपविले.
शिवाजी प्रभाकर भालेकर (रा. माळीवेस) या व्यवसायिकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. घटनास्थळी पोलिसांनी जावून पंचनामा केला. दुसरी आत्महत्येची घटना परळी तालुक्यातील भोपळा येथे घडली. मनोहर इंद्रजित गुट्टे याने आत्महत्या केल्याचे आज समोर आले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. या आत्महत्येचे कारणही स्पष्ट होऊ शकले नाही.