आष्टीच्या डीवायएसपींची कारवाई, आयजींना मिळाली होती टिप
बीड (रिपोर्टर): आष्टी विभागाचे उपअधीक्षक अभिजीत धराशिवकर यांनी बीड तालुक्यातील घोडका राजुरी शिवारात सोमवारी (दि.3) रात्री साठा केलेला गुटखा जप्त करत दोघांवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात तक्रार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न व औषध अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी पिंपळनेर ठाण्यात दिलेल्या फिर्यादिनुसार उपनिरीक्षक पतंगे यांना विशेष पोलीस महानिरीक्षक यांना मिळालेल्या माहितीवरून उपअधीक्षक धाराशिवकर यांनी कारवाईस पाठवले. बीड तालुक्यातील घोडका राजुरी शिवारात अशोक धोंडीराम डरपे यांच्या शेडमध्ये विविध प्रकारचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला 2 लाख 3 हजार 534 रुपयांचा गुटखा आढळून आला. हा गुटखा बाळासाहेब घुमरे (रा. मैंदा ता.बीड) याकडून घेतल्याचे सांगितले. या प्रकरणी दोघांवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डरपे अटक असून गुटखा माफिया घुमरे फरार आहे.