राजकारण खरचं इतकं खालच्या पातळीवरच असतं हे आज कळलं. पुर्वी असं राजकारण नव्हतं. राजकारणात एक सुंस्कृतपणा होता. आज तो संपुष्टात आला. मतदारांशी इमान राखणारे नेते होते, पण आज पावला, पावलावर बदलाचे वारे आणि धोके दिसून येवू लागले. कोण, कोणा सोबत जाईल आणि कधी कोणाचा गेम होईल हे सांगता येत नाही. काल एकमेकांशी राजकीय उणेदुणे काढणारे काही दिवसांनी गळाभेट घेतात, मागचं सगळं काही विसरुन जातात ही कमालीचीच गोष्ट आहे. मतदारांनी आपल्या उमेदवारांना मतदान टाकलेलं असतं, ते म्हणजे विकासासाठी, पक्षासासाठी. ज्या उमेदवारांना निवडून दिलेलं असतं. त्या उमेदवारांकडून मतदारांच्या प्रचंड अपेक्षा असतात. पुढार्यांच्या सत्तेसाठी वाकडया, तिकड्या उड्या पाहता, मतदार प्रचंड प्रमाणात गोंधळून गेले. नेमकं होतयं काय हेच कळेना? कोण कोणाचा विरोधक आणि कोण कोणाचा समर्थक हे कळायला मार्ग नाही. जयजयकार करायचा कोणाचा, अन कोणाला विरोध कारायचा हे कार्यकर्त्यांना कळेना? परवाच्या राजकीय घडामोडी पाहता. मतदारांना वेड लागण्याची वेळ आली. आपण कोणाला मतदान केलं आणि त्याचे परिणाम काय होवू लागले. याचं आत्मचिंतन मतदार करु लागले.
काळंबेरं तर नाही ?
राष्ट्रवादी पक्षाने भाकर फिरवली. पक्षाच्या कार्याध्यक्षपदी खा. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची निवड करण्यात आली. या कार्यकारणीमध्ये अजित पवार यांना संधी देण्यात आली नाही. अजित पवार नेहमीच नाराज असतात. त्यांच्या नाराजीचा सुर नेहमी पाहावयास मिळत असे. पवार हे भाजपा सोबत जाणार अशी चर्चा होती. परवा त्यांनी पक्षाच्या आमदार व खासदारांची बैठक घेवून थेट विधानभवन गाठले. पवार यांनी आपल्या नऊ सहकार्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेतली. यापुर्वी अजित पवार यांनी फडणवीस यांच्या सोबत पहाटे शपथ घेतली होती. या वेळी दुपारी शपथविधी झाला. त्या वेळचा शपथविधी काही तासा पुरताच होता. यावेळी तसं काहीही होणार नाही. कारण सगळी तयारी करुनच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. शरद पवारांनी भाकर फिरवली. भाकर फिरवण्याचा उलट परिणाम झाला. अजित पवार भाकरीसह दोरडीच घेवून भाजपाच्या दारात गेले. पवारांना आपल्या पुतण्याने धोका दिला. राज्याला चुलत्या, पुतण्याचं राजकारण काही नवं नाही. अजित पवाराचं हे बंड पक्षाच्या सहमतीचं आहे की खरचं आहे यावर ही चर्चा होत आहे. पवारांच्या विश्वासातील माणसं अजित पवारांच्या बाजुने जातात म्हणजे त्यात काही काळंबेरं तर नाही ना असं ही वाटू लागलं?
अस्वस्थ शिंदे गट
महाआघाडीच्या सरकारला पाडून एकनाथ शिंदे भाजपा सोबत गेले. महाआघाडीत आम्हाला योग्य वागणुक मिळत नव्हती. आम्हाला निधी दिला जात नव्हता. सगळं काही राष्ट्रवादीच्या मनानूसार चालल होतं. अजित पवार आमच्याशी चांगले वागत नव्हते, अशा प्रमुख तक्रारी शिंदे व त्यांच्या समर्थकांच्या होत्या. ज्या अजित पवारांच्या विरोधात आज पर्यंत तक्रारी केल्या जात होत्या तेच अजित पवार शिंदे, भाजपच्या मांडीला मांडी लावून बसण्यासाठी आले. अजित पवार मंत्रीमंडळात आल्याने शिंदे गटाची चांगलीच गोची झाली. मुख्यमंत्री प्रतिक्रिया देतांना म्हणाले की, विकासाच्या दृष्टीने हे चांगले पाऊल आहे, असं त्याचं म्हणणं होतं. तीन गट मिळून असे काय विकासाचे दिवे लावणार? दोन गटाला विकास कारता येत नव्हता का? शिंदे यांना नेमकं काय बोलावं हेच कळतं नव्हतं? शिंदे गटाने जास्त वळवळ करु नये म्हणुन की काय अजित पवारांना आपल्या सोबत आणण्याची खेळी भाजपाने केली? ज्या शिंदे गटातील मंत्र्यांची वरवचढाची भाषा होती. आता ती शांत होणार आहे. मंत्री मंडळाच्या विस्तारात शिंदे गटाच्या काही मंत्र्यांना बाजुला सारलं तरी कुठल्याही तक्रारी राहणार नाहीत. आता शिंदे यांची तितकी गरज भाजपाला राहणार नाही. चांगला तगडा नेता भाजपाच्या सोबतीला आला आहे. अजित पवार सगळ्याच बाबतीत परिपक्क असणारा नेता आहे. भाजपाने एका दगडात अनेक पक्षी मारण्याचं काम केलं.
#वर्षात पुन्हा बंड
महाआघाडीचं सरकार पाडण्याला एक वर्ष होत आहे. एक वर्षात राज्यातील हे दुसरं मोठं बंड आहे. ज्यांच्यावर कारवाईसाठी ठाकरे गटांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यात अजुन काहीच झालं नाही. न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना कारवाईचे अधिकार असल्याचे म्हटलेले आहे. अध्यक्ष नार्वेकर यांनी अजुन ही शिवसेनेच्या बंडखोरावर कारवाई केली नाही. आता पुन्हा अजित पवारांच्या रुपाने दुसरं बंड समोर आल्याने याबाबत विधानसभा अध्यक्ष कुठली भुमिका घेणार? ज्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. ती नियमबाह्य असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे म्हणणे आहे. जयंत पाटील, शरद पवार बंडखोराबाबत नेमकी काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे. भाजपाने शिवसेना संपवली. त्याच पध्दतीने राष्ट्रवादीची अवस्था केली? राष्ट्रवादी हा भाजपासाठी अवघड आणि अडचणीचा होता. आगामी काळाचा विचार करुन हे सगळं घडवून आणण्यात आलं. महाआघाडी एकत्रीत राहिली असती तर कोणत्याच निवडणुकात भाजपा पुढे राहिला नसता. भाजपाला कुठल्या ही परस्थितीत राष्ट्रवादीवर हातोडा मारायचा होता. तो अखेर मारण्यात आला. स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका जाणीव पुर्वक राखण्यात आल्या आहेत. भाजपासाठी जो पर्यंत पोषक वातावरण निर्माण होत नाही. तो पर्यंत स्थानिकच्या निवडणुका घेण्यात येणार नाही अशीच व्युहरचना करुन ठेवण्यात आली आहे. आता सगळं काही भाजपाच्या बाजुने झाल्यासारखं झालं आहे. काँग्रेसचं तितकं आव्हान नाही. होतं ते राष्ट्रवादीचं, राष्ट्रवादीच्या मुळावर घाव मारण्याचं काम भाजपाने केल्याने पुढील राजकीय समीकरणे वेगळे पाहावयास मिळतील.
#मोदी बोलले अन,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ दिवसापुर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांवर भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचा आरोप केला होता. राष्ट्रवादीने सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा दावा मोदी यांनी केला होता. मोदी यांच्या या वक्तव्याला काही दिवसाचा कालावधी लोटत नाही, तोच अजित पवार यांनी भाजपाशी जुळवून घेतलं. आता भाजपावाले अजित पवार यांच्या भ्रष्टाचारावर कधीच बोलणार नाही, किंवा त्यांना आपण असं काही बोललं होतोत असं वाटणार नाही. जे, जे भ्रष्टाचार प्रकरणातील नेते आहेत, ते भाजपात गेल्यानंतर स्वच्छ होतात हा आज पर्यंतचा इतिहास आहे. बाहेरच्या लोकांना आपल्या पक्षात घेवून भाजपाने पक्ष वाढवला. काहींना धमकावून तर काहींना लालुच दाखवून भाजपाने इतर पक्षाची वाट लावण्याचं काम केली. बाहेरच्यांना सत्तेचा गालीचा व पक्षातील नेत्यांना वेटींगचा सल्ला देणं म्हणजे एक दिवस भाजपात खदखद होवून बंडखोरीचा स्फोट झाला तर नवल वाटायला नको. देवेंद्र फडणवीस राज्यात राहतात की, केंद्रात जातात? फडणवीस केंद्रात गेले तर इतरांवर राज्याची धुरा सोपवणं तसं भाजपासाठी अवघड जाऊ शकतं, कारण फडणवीस हे मुरब्बी राजकारणी झाले. राज्याच्या भाजपात त्यांच्या इतका चाणक्य दुसरा कोणी नाही. राज्यात जे काही फोडाफोडीचं राजकारण आणि ईडी, सीबीआयचा गैरवापर होत आहे ते केंद्राच्या सहमतीनेच होत आहे. अशा पध्दतीचं राजकारण हे लोकशाहीला मारक आहे. आजची राजकीय अवस्था पाहता, लोकांचा राजकारण्यावरचा विश्वास पुर्णंता: उडालेला आहे. सत्तेसाठी इतका बेईमानपणा असू नये. राज्याच्या जनतेचे बेहाल आहेत. शेतकर्यांचे, बेरोजगारांचे प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न बाजुला राहिले आणि रोजच राजकीय तमाशा पाहण्याची वेळ राज्यातील जनतेवर आली हे राज्याचं दुर्देव म्हणावं लागेल.
भाकर फिरवली अन..!

#काळंबेरं तर नाही ?

वर्षात पुन्हा बंड