छत्रपती चौकातील प्रकार, श्वान पथकासह फॉरेन्सिक व्हॅनला पाचारण, पोलीसांकडून पंचनामा
वडवणी (रिपोर्टर):- वडवणी शहराचे प्रवेशद्वार आसणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जय सोमनाथ हाँटेल शेजारी प्राव्हेट कंपनीचे एटीएम मिशन चोरट्यांनी मध्यरात्री पळविली आहे. तर हि कामगिरी चोरट्यांनी अवघ्या सातच मिनिटात केल्याचे निष्पण झाले आहे. याघटनेन शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तर श्वान पथका सह मोबाईल फॉरेन्सिक इन्व्हेस्टेशन व्हॅनला पाचारण करण्यात आले होते. तर पोलीसांकडून घटनास्थळाचा पंचनामा केला असुन एटीएम मशिनमध्ये रोकड किती होती ? हे स्पष्ट झाले नाही.
वडवणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौका लगतच जय सोमनाथ हाँटेल आहे याचं शेजारी इंडियन नं. 1 या कंपनीचे खाजगी एटीएम मशिन बसवलेली आहे. या मशिनमध्ये कालच कँशचा भरणा केलेला होता असं बोललं जात आहे. मध्यरात्री 2.50 मि. ते 2.57 मिनिटाच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सदरील मशिनला साखळीच्या सहाय्याने गाडीला बांधून बाहेर काढत मशिन गाडीत टाकून चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणामुळे शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. वडवणी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत तपासासाठी मोबाईल फॉरेन्सिक इन्व्हेस्टेशन व्हॅन बोलावून प्रिंगर घेण्यात आले आहे. तर श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. श्वानला देखील ताळमेळ लागला नसल्याने श्वान परत परतले आहे. तर पोलीसांकडून पंचनामा केला असून एटीएम मालकाला देखील भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधाला असल्याच सांगण्यात आले असून सदरील एटीएम कंपनीकडून रेकाँर्ड मागविले जाईल यानंतर रोकड किती होती हे समजणार आहे.
एपीआय यांना सलामी कि आव्हान
वडवणी पोलीस स्टेशनला अवघ्या चार दिवसांपुर्वीच एपीआय अमन सिरसट अधिकारी म्हणून रुजू झाले आहेत. आज चोरट्यांनी भर चौकातील कँश भरलेली एटीएम मशिनच चोरट्यांनी पळविली असून नवनिर्वाचित एपीआय यांना अज्ञात चोरट्यांनी सलामी कि आव्हान दिले ? असा प्रश्न उपस्थित राहत असून वडवणी पोलीसांकडून तपासाचे आव्हान असणार आहे.
एपीआय सिरसट म्हणाले कि…
सदरील हि चोरी मध्यरात्री 2.50 ते 2.57 मि.या कालवधीत झाली असुन येथील सीसीटिव्हीचे कँमेराचे साठवण उपकर देखील एटीएम सोबत चोरीला गेले आहे.परंतु शेजारी सीसीटिव्ही कँमेरा होता तो एवढा कॅप्चर करत नव्हता परंतु यापासून महत्वाची माहिती मिळाली असून यामध्ये चोरट्यांनी सुझुकी विको गाडी वापरली आहे. कंपनीकडून रेकाँर्ड मागितल्यानंतर कँश किती होती हे सांगितले जाईल अशी प्रतिक्रिया सहाय्यक पोलीस निरीक्षक अमन सिरसट यांनी दिली आहे.