केज (रिपोर्टर): केज शहरातील धारूर रोडवर असलेली डीपी गेल्या दहा दिवसांपासून खराब झाला. सदरील डीपी आज बसविण्यात आला होता, मात्र हा डीपीही खराब झाल्याने शहरात अंधार आहे. वीज वितरण कंपनीकडून वेळेवर विजेची कामे केली जात नसल्याने नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आता दुसरा डीपीही खराब झाला असून त्याला दुरुस्त करायला किती दिवस लागणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
धारूर रोडवरील डीपीवर अर्धे शहर अवलंबून आहे. हा डीपी दहा दिवसांपूर्वी खराब जालेला आहे. डीपी अभावी शहर अंधारात असून आज डीपी बसविण्यात आला होता, हा डीपी सुरू करताच त्यामध्ये आवाज आला आणि डीपी बस्ट झाला. पुन्हा नवीन डीपी आणून बसवावा लागणार आहे. हा डीपी नेमका कधी बसणार अणि नागरीकांच्या समस्या कधी सुटणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.