वाहन धारकांना शिस्त
लावण्याचे निर्देश
नेकनूर (रिपोर्टर): नेकनूरमध्ये आज आठवडी बाजार असल्याने बाजाराच्या दिवशी जागोजागी वाहतूक ठप्प होत असते. सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी स्वत: रस्त्यावर उतरून वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या समवेत नेकनूर ठाण्याचे पोलीस अधिकार्यांसह कर्मचार्यांची उपस्थिती होती.
मराठवाड्यातील सर्वात मोठा जनावरांचा बाजार आज नेकनूर येथे भरत असतो. आजच्या दिवशी नेकनूरकडे येणार्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. ग्रा.पं. हद्दीतही अनेक ठिकाणी नागरिकांची वरदळ असते, त्यामुळे जागोजागी वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो. काही नागरीक आपली वाहने व्यवस्थीतपणे लावत नसल्यामुळे वाहतूक ठप्प होते. पंकज कुमावत यांनी स्वत: रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला वाहन धारकांना शिस्त लावण्याचे निर्देश नेकनूर पोलिसांना दिले आहेत.