बीड (रिपोर्टर) आज्जी रागवल्याच्या किरकोळ कारणावरून एका 18 वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज बीड तालुक्यातील उमरद खालसा येथे घडली.
गणेश नारायण कोल्हे (वय 18 वर्षे, रा. उमरद खालसा) या तरुणाला काल सकाळी त्याची आज्जी किरकोळ कारणावरून रागवली होती. तेव्हापासून तो बेपत्ता होता. रात्री ग्रामस्थांनी त्याचा शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. आज सकाळी उमरद खालसा शिवारात असलेल्या एका शेतकर्याच्या विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती पिंपळनेर पोलिसांना मिळताच घटनास्थळी बिट अंमलदार दराडे यांनी भेट देऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला.