बीड (रिपोर्टर)
येथील जिल्हा रूग्णालयातील स्त्री रोग तज्ज्ञ आपल्या चार चाकी वाहनातून औरंगाबादला जात होते. पाचोडजवळ गाडीवरील (एम.एच. 23 ए.एस. 9294) नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या खाली गेली. गाडीने पलट्या मारल्याने डॉक्टरसह अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांनाही औरंगाबादच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्यांची प्रकृती ठिक असल्याचे जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी रिपोर्टरला सांगितले.
डॉ. रामेश्वर आवाड असे जखमी डॉक्टरचे नाव आहे. डॉ.आवाड हे जिल्हा रूग्णालयात कार्यरत असून आज सकाळीच औरंगाबादला आपल्या चारचाकी वाहनातून जात होते. पाचोडजवळ त्यांच्या स्टेअरींगवरील ताबा सुटला. त्यामुळे गाडी रस्त्याच्या खाली गेली. गाडीने पलटी मारल्याने गाडीचा चुरा झाला होता. याच गाडीत डॉ. आवाड यांचे ओळखपत्रही सापडले आहे. ते औरंगाबादला कशासाठी जात होते आणि आणखी सोबत कोण होते, हे मात्र समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे हे देखील औरंगाबादकडे रवाना झाले आहेत.