नगदी एक लाख रुपयांसह अडीच तोळे सोने लांबविले
बीड (रिपोर्टर): पेरणीसाठी गावाकडे गेलेल्या सेवानिवृत्त पोलीस कर्मचार्याच्या घरी चोरीची घटना घडली. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील नगदी एक लाख रुपये व अडीच तोळे सोने चोरट्यांनी लांबविले. ही घटना शहरातील स्वराज्यनगर भागात घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीच्या तपासाठी एलसीबी, फिंगर प्रिंट पथक दाखल झाले होते.
भालचंद्र ढेपे हे पेरणी करण्यासाठी काल आपल्या गावाकडे गेले होते. याच संधीचा फायदा अज्ञात चोरट्यांनी साधून त्यांच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील कपाटामधील नगदी एक लाख रुपये व अडीच तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. ढेपे गावाहून परत आल्यानंतर त्यांना आपल्या घरी चोरी झाल्याचे दिसून आले. या प्रकरणी त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार झाली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीच्या तपासासाठी एलसीबी, फिंगर प्रिंट पथक दाखल झाले होते.