बीड (रिपोर्टर): घराला कुलूप लावून सर्व जण शेतात गेल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने शेतकर्याचे घर फोडून घरातील कपाटात ठेवलेले सोने-चांदी सह रोख रक्कम असा एकूण 1 लाख 25 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पाटोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाबुराव गंगुबाई कदम (रा.लिबादेवी ता. पाटोदा) हे शेतकरी काल सकाळी शेतात गेले होते. सर्व जण शेतीकामात व्यस्त असतांना दुपारी दोनच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घर फोडून घरातील रोख रक्कम सोने चांदी असा एकूण 1 लाख 25 हजाराचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी पाटोदा पोलिसात कदम यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.