बीड ग्रामीण पोलिसांनी जोडप्याला घेतले ताब्यात, पोक्सोसह गंभीर गुन्हे दाखल
बीड (रिपोर्टर): आल्पवयीन मुलीचा बालविवाह झाला. सासरी आल्यानंतर तिचे एका मुलासोबत सुत जुळले अन् त्यांनी धूम ठोकली. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात मुलिच्या वडिलांनी मिसिंग दाखल केली. पोलिसांनी तांत्रीक तपासाच्या आधारे कल्याण येथून जोडप्याला ताब्यात घेतले. तपासात तीचा बालविवाह झाल्याचे समोर आले. या प्रकरणी प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्यावर पोक्सो अन् भावावर त्याच्यावर अन्य गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
जामदया ता. शेनगाव जि. हिंगोली येथील एक कुटुंब पाडळसिंगी ता. गेवराई येथील शिंदे नामक शेतकर्याच्या शेतात सालगडी म्हणून कामासाठी आलेले आहे. त्यांना एक मुलगी आहे. त्यांचेच नातेवाईक (बहिन आणि तीचा पती हे बीड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जप्ती पारगाव येथील देशमुख नामक शेतकर्याकडे सालगडी म्हणून काम करत आहे. पाडळसिंगी येथील सालगड्याने आपल्या मुलिचा विवाह त्याच्या बहिनीच्या मुलासोबत लावून दिला. ती सासरी आपल्या पतीसह सासू सासरे यांच्यासोबत रहात असतांना हिरापुर येथील किशोर गोरख कांबळे याच्यासोबत तीचे सुत जुळले त्यानंतर ते 3 मे रोजी पळून गेले. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात मुलीच्या वडिलांनी मुलगी हरवल्याची तक्रार दिली होती. त्यानंत बीड ग्रामीणचे पोलिसांनी तांत्रीक तपास करुन काल बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार जयसिंग वाघ, गंगाराम घोडके, म.पो. ना. काटे यांनी पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर तत्कालीन ठाणेप्रमुख संतोष साबळे, ठाणेप्रमुख विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गाठून तेथील कोळसेवाडी पोलिसांच्या मदतीने नांदेवाली येथून दोघांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात आणले असता. तीचा बालविवाह झाल्याचे समोर आले. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपी किशोर गोरख कांबळे रा. हिरापुर ता. गेवराई याच्या विरुध्द पोक्सो गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्याचा भाऊ बाळू किशोर कांबळे याच्या विरुध्द गुन्हेगाराला मदत करण्यासह अन्य गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पिंक पथक प्रमुख एपीआय अंतरप हे करत आहेत.
अंतरजातीय विवाह झालाय,
म्हणत घेतला आसरा
आरोपीने विवाहित मुलीला पळवून नेल्यानंतर तो कल्याण येथील कोळवाडी पोलीस ठाणे हद्दीतील नांदवली येथे राहू लागला. माझा या मुलीसोबत अंतरजातीय विवाह झालाय, त्यामुळे घरचे नाराज आहेत, त्यामुळे मला येथे राहू द्या, असे म्हणत आसरा मागितला आणि जवळच असलेल्या एका खासगी शाळेत शिपाई म्हणून काम करू लागला. दोन – अडीच महिन्यानंतर पोलीस दाखल झाल्याने सगळा भंडाफोड झाला.