अंबादास दानवे आक्रमक; अनेक महिलांच्या तक्रारी असल्याचा दावा
मुंबई (रिपोर्टर): केंद्र सरकारची सुरक्षा असलेले भाजपाचे बडे नेते किरीट सोमय्या यांचे अश्लील व्हिडिओ घेऊन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे थेट विधान परिषदेत गरजले. नैतिकतेच्या गप्पा मारणार्या पक्षाच्या नेत्याने महिलांची हरर्रासमेंट केली. अनेक महिलांना धमक्या देून त्यांचा गैरफायदा घेतला. काही महिला अधिकार्यांबाबतही असेच वर्तन सोमय्यांनी केल्याचा खळबळजनक दावा या वेळी अंबादास दानवे यांनी केला. या प्रकरणाची सत्यता समोर आणावी, अशी मागणी केली. या वेळी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार, असे म्हटले तर सभापती निलम गोर्हे यांनी याबाबत चिंता व्यक्त करून कुठल्या महिलांबाबत असे काही घडले असेल तर त्यांनी समोर यावे, सभागृह त्यांच्या पाठीशी असेल, असे आवाहन केले.
भाजपाचे नेते किरीट सोमय्या हे काल व्हिडिओद्वारे उभ्या देशाला उघडे-नागडे आणि भोेंगळे दिसले. यामुळे महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडाली. नैतिकतेच्या गप्पा मारणार्या पक्षाचा नेता आणि त्याच्या अश्लील व्हिडिओने महाराष्ट्र सुन्न झाला. आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अश्लील व्हिडिओचा पेन ड्राईव्ह विधान परिषदेत नेला. अध्यक्षांकडे सुपूर्द करत तब्बल आठ तासांचे सोमय्या यांचे अश्लील व्हिडिओ असल्याचे त्यांनी म्हटले. या प्रकरणात दुधाचे दूध आणि पाणीचे पाणी झाले पाहिजे. ज्या नेत्याला केंद्र सरकारची सुरक्षा आहे, त्या सुरक्षेच्या आडून हा नेता महिलांसोबत अभद्रता करतोय का? अशी भिती व्यक्त करत आपल्याकडे अनेक महिलांच्या तक्रारी असल्याचे म्हटले. ज्या महिलेने हा व्हिडिओ दिला तिला दानवेंनी धन्यवाद दिले. या प्रकरणावर फडणवीसांनी भाष्य करताना, कोणालाही सोडले जाणार नाही, नि:पक्षपातीपणे चौकशी केली जाईल, असे म्हटले तर निलम गोर्हे यांनी महिलांच्या तक्रारी असतील त्यांनी समोर यावे, सभागृह तुमच्या पाठीशी असेल, असे म्हटले.