वडवणी (रिपोर्टर):- रस्त्याच्या कडेलाच महावितरणाची डिपी होती. यांच्या आरतींचा करंट
लागून बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पिंपळा रुई येथे काल घडली असून सदरील बैल दगावल्याने शेतमजुराचे 70 हजार रुपायाचे नुकसान झाले असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
वडवणी तालुक्यातील पिंपळारुई येथील खेड वस्तीवरील रहिवाशी असणारे अफसर सत्तार शेख वय-40 वर्षीय यांच्या दोन खिल्लार बैलाची जोडी होती. यावरच मेहनत करुन कुंटुबाचा आर्थिक गाडा चालत होता.यात काल सकाळी शेती कामासाठी बैलजोडी जात असताना रस्त्या लगतच महावितरणाची विजेची डिपी होती. याठिकाणाहून जात आसताना अचानक अर्तिंगचा करंट लागला आणि यामध्ये एका बैलाचा दुर्देवी जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये शेतमजुराचे जवळपास 70 हजाराचे नुकसान झाले असल्याने याभागात हळहळ व्यक्त केली जात आहे.