बीड (रिपोर्टर): बीड शहरातून पुण्याकडे एका अल्पवयीन मुलीस पळवून घेऊन जात असताना सदरील तरुणास शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश टाकसाळ हा तरुण पुणे येथून फर्निचर घेऊन बीड येथे आला होता. परत जात असताना त्याने शहरातील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले होते. याबाबत मुलीच्या नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून मुलास व मुलीस नगर येथून ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास वाघमोडे हे करत आहेत.