दीड तास वाहतूक ठप्प
माजलगाव (रिपोर्टर): अतिवृष्टीचे थकित अनुदान द्यावे, थकित ऊसबील रक्कम शेतकर्यांना तत्काळ द्यावी, उसाचे 265 वाण लागवडीसाठी परवानगी द्यावी, यासह लामेवाडी फाटा ते हनुमान मंदिर रस्ता तत्काळ करावा आदी मागण्यांसाठी मनसेच्या वतीने महेकर – पंढरपूर हायवेवरील रस्त्यावरील लामेवाडी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दीड तास आंदोलनकर्ते रस्त्यावर बसले होते. या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.
शेतकर्यांचे विविध प्रश्न घेऊन आज सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी लामेवाडी फाटा ते हनुमान मंदिर असा रस्ता तत्काळ करण्यात यावा, अशी मागणी गावकर्यांच्या वतीने करण्यात आली. रस्त्यावर जवळपास दीड तास आंदोलक बसल होते. या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. माजलगाव ग्रामीण पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. या वेळी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. आंदोलनात मनसे जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे, तालुकाध्यक्ष धोंडीराम जाधव, जिल्हा उपाध्यक्ष गणेश वाघमारे, रेखा अंबुरे, गोविंद देशमाने, रमेश जोगडे, सिद्धेश्वर शार्म, वैभव सोळंके, अक्षय शेंडगे, महेंद्र पवार, पांडुरंग जाधव, अविनाश गायकवाड, नामदेव सरवदे, नवनाथ दराडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.