गैरहजर कर्मचार्यांचा एक दिवसाचा पगार कपात करणार
नेकनूर (रिपोर्टर): जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी नेकनूर रुग्णालयाला अचानक भेट दिली. गैरहजर कर्मचार्यांना चांगलेच धारेवर धरून या कर्मचार्यांचा एक दिवसाचा पगार कपात करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.या वेळी त्यांनी काही रुग्णांची स्वत:हून तपासणी केली आहे.
नेकनूर रुग्णालयामध्ये दररोज कित्येक रुग्ण उपचार घेत असतात. डॉक्टरासह काही कर्मचारी वेळेवर हजर राहत नसल्याने रुग्णांची गैरसोय होते. आज डॉ. साबळे यांनी रुग्णालयाला अचानक भेट दिली. या वेळी काही कर्मचारी हजर नसल्याने त्यांना चांगलेच धारेवर धरून त्यांचा एक दिवसाचा पगार कपात करण्याचा निर्णय घेतला. साबळे यांनी स्वत: काही रुग्णांची तपासणी केली. वेळेवर हजर राहण्याच्या सूचना सर्व कर्मचार्यांना साबळे यांनी दिल्या आहेत.