गेवराई (रिपोर्टर): दुचाकीवर गावी जात असलेल्या एका तरुणाला अज्ञात चौघांणी अडवून डोक्यात बिअरची बाटील फोडत लुटल्याची धक्कादायक घटना 22 जुलै रोजी गेवराई पांढरवाडी रस्त्यावरील आढ्याजवळ घडली. या प्रकरणी गेवराई पोलिसात अज्ञात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महादेव मानिकराव मोरे (वय 35 वर्षे, रा. जापिंप्री. ता. गेवराई) या तरुणाने गेवराई पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते दि. 22 जुलै रोजी आपली पल्सर क्र. एम. एच. 22 बीडी. 1524 ने गेवराई वरुन राजप्रिप्री येथे जात असतांना चार अनओळखी इसमांनी दुचाकी अडवून काही कळायच्या आत डोक्यात बीअरची बाटली फोडली. खंभीर जखमी झालेल्या तरुणाच्या खिशातील मोबाई, पाच-पाच ग्रॉमच्या दोन आंगठ्या व रोख रक्कम 8500 रुपये लंपास केले. या प्रकरणी गेवाई पोलिस अधिक तपास करत आहेत.