नेकनूर (रिपोर्टर): चौसाळा येथील एका हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमावत यांना झाल्यानंतर त्यांनी रात्री त्याठिकाणी धाड टाकली असता तीन महिला व तीन व्यक्ती आढळून आले. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली.
चौसाळा येथील जानकी बिअरबारमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांना झाल्यानंतर त्यांनी रात्री आठच्या दरम्यान त्याठिकाणी धाड टाकली. सदरील हॉटेलमध्ये तीन महिला आढळून आल्या. या प्रकरणी गणेश लहाने (रा. महाकळा ता. अंबड), दिनेश सोनवणे (रा. चौसाळा), दशरथ थोरात (रा. चौसाळा) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सचीन पांडकर, अप्पर पोलीस अधिक्षक अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्यासह पथकातील पीआय पवार, पोलीस हवालदार आतिश देशमुख, राजू वंजारे, गिते, महिला पोलीस प्रभा ढगे, पो.कॉ. संतराम थापडे, गणेश नवले, तुकाराम कानतोडे, युवराज चव्हाण आदींनी केली. या प्रकरणाचा अधिक तपास नेकनूर ठाण्याचे हजारे हे करत आहेत.