छोट्या-मोठ्या व्यवसायिकांसह विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात
वीजपुरवठा सुरळीत करा,
दोषींवर कारवाई करा
बीड (रिपोर्टर): बीड शहरातल्या काही भागात वीज कंपनीकडून जाणीवपुर्वक तुच्छ वागणूक दिला जात असल्याचा प्रकार उघडकीस येत असून गेल्या एक ते दीड महिन्यापासून शहरातल्या गांधीनगर, इस्लामपुरा, तेलगावनाका यासह अन्य परिसरांमध्ये रोज किमान दहा ते बारा तास वीज नसते. गेल्या 48 तासांपासून या भागातली वीज पुर्णत: बंद असल्याने या भागातील नागरीकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याच भागात दारुल उलूम यांचे निवासी वस्तीगृह असून या ठिकाणी एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थी निवासी आहेत. विजेचा सातत्याने लपंडाव आणि वीज नसते यामुळे त्यांच्या अभ्यासासह भविष्यावर मोठे विपरीत परिणाम होत आहेत. वीज कंपनीच्या या अनागोंदी कारभाराची गंभीर दखल घेत दोन महिन्यांपासून विजेकडे दुर्लक्ष करणार्या संबंधित कर्मचारी आणि अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.
वीज कंपनीला कोणी मालक आहे का? अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कोणाचा वचक आहे का? वीज कंपनी सर्वसामान्यांकडून विजे बिलाची पै ना पै वसूल करते. मात्र तेवढ्या तत्परतेत सेवा देत नाही. बीड शहरात तर वीज कंपनीने काही भाग आदिवासी सदृश्य करून टाकले आहेत. शहरातील गांधीनगर, इस्लामपुरा, तेलगाव नाका, नूर कॉलनी, हुसैनिया कॉलनी, मोहम्मदीया कॉलनी आदी भागांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून बारा बाा तास वीज नसते. गेल्या 48 तासांपासून हा संपूर्ण भाग अंधारात आहे. वीज कंपनीचे अधिकारी, कर्मचारी याकडे पुर्णत: दुर्लक्ष करत आहेत. या भागांमध्ये छोटे-मोठे व्यवसाय करणार्या लोकांना मोठा भुर्दंड पडत आहे. विद्यार्थ्यांपासून व्यापार्यांपर्यंत वीज नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याच भागात दारुल उलूम आणि दोन महाविद्यालये आहेत. या ठिकाणी हजारोच्या संख्येने विद्यार्थी निवासी असतात. वीज नसल्याने या विद्यार्थ्यांना अभ्यास करता येत नाही. त्यांच्या भविष्यावर विपरीत परिणाम होतो. या भागातला वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करण्यात यावा आणि दोषी अधिकारी, कर्मचार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.
बार्शी नाक्यावरील डि.पी.ला लागली आग
पेठ बीड भागामध्ये विज वितरण कंपनीचं नियंत्रण नाही. विजेच्या बाबतीत हलगर्जीपणा केला जात आहे. त्यामुळे नागरीकांसह व्यापार्यांत संताप व्यक्त केला जात आहे. आज बार्शी नाका येथील डि.पी.ला चक्क आग लागल्याने यात डि.पी. पुर्णतः जळाला. डि.पी. दुरूस्तीकडे विज वितरण कंपनी लक्ष देत नाही. यामुळे सतत या भागातील डि.पी.नादुरूस्त होत आहे.