बीड (रिपोर्टर): कंत्राटी महिला सफाई कामगारांच्या प्रश्नाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असून शासनाने कामगारांच्या मागण्या मान्य कराव्यात, यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर महिला कामगारांनी काही वेळ रास्ता रोको आंदोलन केले आहे.
नगरपालिका अंतर्गत काम करणार्या कंत्राटी महिला कामगारांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबीत आहेत. त्यांना किमान वेतन दिले जात नाही. वेतनासाठी हे कामगार सतत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत असतात. आज या कामगारांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.