मुंबई (रिपोर्टर): भिडेंना अटक करा नाही तर खुर्च्या खाली करा, राष्ट्रपुरुषांचा अवमान करणार्या भिडेंना अटक झालीच पाहिजे, अशा प्रचंड घोषणा देत विरोधी आमदारांनी आज विधानसभेच्या पायर्यांवर आंदोलन केले. गांधी टोपी घातलेल्या आमदारांनी वाचाळवीर भिडेचा बंदोबस्त झालाच पाहिजे, अशी भूमिका घेतली तर विधानसभेत याचे तीव्र पडसाद उमटून भिडेंविरोधात विरोधक आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. या वेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापुरुषांचा अवमान सहन करणार नाही, असे म्हणत काँग्रेसच्या मुखपत्रात सावरकरांचा अपमान होत असल्याचा मुद्दा मांडला. त्यांच्यावरही कारवाई करा, असे फडणवीस म्हणाले तर विधानसभेच्या अधिवेशनाला केवळ तीन दिवस उरल्याने वेगवेगळ्या मुद्यांवरून विरोधक आक्रमक हातेाना दिसून आले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा ज्योतीबा फुले, साईबाबा यांच्यासह कित्येक समाजसुधारकांबाबत मनोहर भिडे नावाच्या व्यक्तीने अत्यंत अश्लाघ्य भाषेत टीका टिपणी केली. याचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटताना दिसून आले. संभाजी भिडे हाय हाय, भिडेंना अटक करा नाही तर खुर्च्या खाली करा, भिडेंना संरक्षण देणार्या कलंकीत सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणांनी विधीमंडळाचा परिसर दणाणून गेला. विरोधी आमदारांनी विधीमंडळाच्या पायर्यांवर जोरदार घोषणाबाजी केली तर विधीमंडळात या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटून भिडेंना अटक करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापुरुषांचा अपमान सहन करणार नसल्याचे सांगत भिडेंपाठोपाठ काँग्रेसच्या मुखपत्रात सावरकरांची बदनामी केली जाते, त्यांच्यावरही कारवाई करा, असेही फडणवीसांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न जीवघेणं झालय, समृद्धी महामार्ग बंद करा
समृद्धी महामार्गावर शहापूरनजीक गर्डर कोसळून 20 कामगार ठार झालेत. या घटनेवरून विरोधकांनी सत्ताधारी राज्य सरकारला कोंडीत पकडले आहे. समृद्धी महामार्ग लोकांसाठी जीवघेणी समृद्धी झालीय. लोकांचा जीव दररोज जातोय. समृद्धी महामार्ग काही काळासाठी बंद करा. ज्या काही उपाययोजना करायच्या त्या आधी करा. देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न जीवघेणं झालंय असं शब्दात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधार्यांवर हल्लाबोल केला.
विधानसभेत समृद्धी महामार्गावरील अपघाताबाबत स्थगन प्रस्तावाची सूचना आणली होती. त्यात वडेट्टीवार बोलत होते. ते म्हणाले की, दर 200-300 किमी रुग्णवाहिका, फूड प्लाझा असायला हवे होते. पण अद्याप कुठलीही व्यवस्था नाही. पंतप्रधानांच्या हस्ते उद्धाटन केले. पण आता बदल करू शकता. 20 लोकांचा जीव जातो. याबाबत सरकार संवेदनशील आहे की नाही. या मृत्यूला जबाबदार कोण? या रस्ता बांधकामात काही त्रुटी आहे का? समृद्धी महामार्गाचे ऑडिट करून घ्या. ज्या काही त्रुटी असतील त्या समोर आल्या पाहिजे. तोवर समृद्धी महामार्ग बंद करावा अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.