शासकीय धान्य गोडाऊनमध्ये काम करणार्या हमालांच्या विविध प्रश्नांकडे शासन दुर्लक्ष करत असून त्यांच्या मागण्या तत्काळ मंजूर करण्यात याव्यात, यासाठी आज हमाल संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करर्यात आली. हे आंदोलन घायाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
माथाडी कायद्यातील तथाकथीत सुधारणा विधेयक तत्काळ मागे घेण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी आज महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. हे आंदोलन राजकुमार घायाळ यांच्या नेतृत्वाखाली झाले. या वेळी शेरजमा पठाण यांच्यासह आदींची उपस्थिती होती.