बीड (रिपोर्टर): बीड शहरातील केएसके कॉलेजमधील बेंचवर धार्मिक भावना दुखावणारा मजकूर लिहिण्यात आला होता. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी जावून संबंधित प्राध्यापकाला ताब्यात घेत दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अज्ञात आरोपी फरार आहे, त्याचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान मुस्लिम समाजाने संयम राखल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनीही वेळीच या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.
बीड शहरातील केएसके महाविद्यालयात काल दुपारी धार्मिक भावना दुखावणारा वादग्रस्त मजकूर लिहिण्यात आला होता. सदरील हा प्रकार समोर आल्यानंतर महाविद्यालय परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी डीवायएसपी वाळकेंसह शिवाजीनगर पोलीस दाखल झाले होते. या प्रकरणी दोषी असलेल्या प्राध्यापकासह अन्य एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील वादग्रस्त मजकूर प्रकरणी समाजाने संयम दाखवला. पोलिसांनी याबाबत वेळीच दखल घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी प्राध्यापकास अटक केली. अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू आहे.