बीड (रिपोर्टर) गाव-पातळीवरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी 630 जलसिंचन विहिरींना मंजुरी देण्यात आली होती. त्यातील 467 विहिरींचे काम सुरू करण्यात आले. यामधील 163 कामे अद्यापही अपुर्ण असून हे कामे येत्या पंधरा दिवसांमध्ये पुर्ण करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असतो. काही ग्रामपंचायती तलावातून पाण्याचा पुरवठा करतात तर काही ग्रा.पं. विहीरी खोदून गावकर्यांना पाणी पुरवतात. पाणी पुरवठ्यासाठी 630 विहिरींना महात्मा गांधी राष्ट्रीय हमी योजनेतून मंजुरी देण्यात आली होती यामधील 467 विहिरींचे काम हे सुरू करण्यात आले. 163 विहिरींची कामे अद्यापही पुर्ण झाले नाहीत. विहिरींच्या कामाचा आढावा गेल्या काही दिवसांपूर्वी विभागीय आयुक्तांनी घेतला असता जी कामे अपुर्ण आहेत ती कामे येत्या 15 दिवसांमध्ये पुर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.