सिरसाळा( रिपोर्टर) :- दुसर्या खातेदारांच्या पॅन कार्ड चा दुरुपयोग करत अज्ञात खातेदाराने आपल्या खात्या मधुन सुमारे 8 कोटी रुपयांचा व्यावहार केल्याचे समोर आले आहे.ज्या पॅन कार्ड वरुन हा कोट्यावधींचा व्यावहार झाला त्या पॅन कार्ड धारकांना आयकर विभागाने ह्या व्यावहरा बाबत खूलासा करण्याची नोटीस बजावली आहे.सदर बाब पॅन कार्ड धारकांना नोटीस आल्याने समजली असुन त्यांना धक्काच बसला आहे.सिरसाळ्यातील अंबाजोगाई पीपल्स बँकेत सदर पॅन कार्ड धारकांचे खाते आहेत. मधुकर श्रीरामपंत टेकाळे व बाबासाहेब काळे दोघे रा. सिरसाळा ता.परळी वैजनाथ यांच्याशी हा प्रकार घडला आहे.
या दोघांचे खाते अंबाजोगाई पीपल्स बँक शाखा सिरसाळा येथे आहे.परंतु त्यांच्या बाबत हा प्रकार ह्याच बँकेच्या इतर शाखेत घडला आहे. टेकाळे यांच्या पॅन कार्ड चा दुरुपयोग लातूर जिल्ह्यातील औसा येथील बँक शाखेत अज्ञात खातेदार (खाते क्रमांक 871008021000179) याने 2 कोटी 71 लाख 13 हजार रूपयांचा व्यवहार केल्याचे समजले आहे . तर बाबासाहेब काळे यांच्या पॅन कार्ड चा दुरुपयोग अहमदनगर येथील बँक शाखेत अज्ञात खातेदाराने करत 5 कोटी 75 लाखाचा व्यावहार केल्याचे समजले आहे. सदर व्यावहारा बाबत आयकर विभागाने टेकाळे व काळे यांना नोटीस बजावली आहे.टेकाळे यांनी सिरसाळ्यातील शाखा व बँकेचे मुख्य कार्यालय अंबाजोगाई येथे जाऊन घडला प्रकार सांगून संबंधित अज्ञात खात्याची तक्रार करत माहिती मागीतला परंतु इतर खातेदारांची माहिती देता येत नाही म्हणत बँकेने सदर प्रकरणात समाधान कारक प्रतिसाद टेकाळे यांना दिला नाही.म्हणून टेकाळे यांनी सिरसाळा पोलीस स्टेशन गाटत या प्रकरणी सह पोलीस निरीक्षक संदिप दहिफळे यांच्या कडे घडल्या प्रकाराची कैफियत मांडली , तक्रारीवरून सपोनि सिरसाळा पोलीस स्टेशन अधिक तपासासाठी संबंधित बँकेस/अधिकार्यांना उपस्थित राहण्यास नोटीस बजावणार असल्याचे टेकाळे यांनी माहिती दिली आहे.
हा ’काळा पैसा’ कुणाचा ?
हजार पाचशे नाही तर तब्बल आठ कोटी रूपयांची उलाढाल झाल्याचे दिसुन येत आहे. ज्याने कोणी खातेदाराने टेकाळे व काळे यांच्या पॅन कार्ड चा दुरुपयोग करत एवढ्या मोठ्या रकमेचा व्यावहार केला आहे. तो नक्कीच ’काळा पैसा असणार यात काही शंका नाही किंवा कर बूडवण्या करिता शासन/प्रशासनासह बँक व पॅन कार्ड धारकांची फसवणूक केली आहे.परंतु सदर बाब समोर येऊन देखील संबंधित पीपल्स बँके कार्यवाही का करत नाही ? इतरांच्या पॅन कार्ड नंबर वर संबंधित शाखांनी कसा काय व्यावहार केला किंवा करु दिला ? असा प्रश्न निर्माण होत आहे.हा प्रकार अतिशय गंभीर आहे. बँकेत खातेदारांचे गोपनीय कागदपत्र फुटत असल्यास सदर बँके बाबत भविष्यात विश्वासार्हतेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात अशी प्रतिक्रिया टेकाळे यांनी दिली आहे