बीड (रिपोर्टर): मांजरसुंबा येथील पोहीचा देवी मंदिर परिसरात अवैध खडी क्रेशर असून मोठ्या प्रमाणात मुरूम उपसला जातो. या वेळी मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट निर्माण होत असून याचा येथील भाविक-भक्तांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हे अवैध उत्खनन तात्काळ बंद करावे, अशी मागणी होत आहे.
मांजरसुंबा परिसरात पोहीचा देवी हे भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेले मंदिर आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भावीक येतात. मंदिराला लागूनच अवैध खडी क्रेशर आहे. मोठ्या प्रमाणात येथे मुरुम उपसला जातो. त्यामुळे धुळीचा त्रास येथील भाविकांना होत आहे. शिवाय खडी क्रेशरमुळे हादरे बसत असल्याने मंदिरालाही त्याचा धोका निर्माण होत आहे. येथील खडी क्रेशर तात्काळ बंद करावे, अशी मागणी भाविक भक्तातून होत आहे. यासाठी 15 ऑगस्ट रोजी आमरण उपोषणही करण्यात आले होते. या वेळी महंत श्री विश्वनाथ बाबा बीडकर, माधेराज दादा ज्ञात, साध्वी अनुराधाताई पाथरीकर, साध्वी द्वारकाताई हलसीकर, साध्वी मालनताई अंकुळनेरकर, साध्वी जयश्रीताई विराट, साध्वी सुमनबाई जयत्कर्ण यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांची उपस्थिती होती.