माजलगाव (रिपोर्टर) – बेरोजगार युवकांच्या व स्थानिक रस्ते, रेशनिंगच्या प्रश्नासाठी डीवायएफआय युवक संघटनेच्या वतीने माजलगाव तहसील कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला.
देशात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे, बहुतांश उच्च शिक्षित तरुणांना स्थायी रोजगार मिळणे कठीण झाले आहे.
यामुळे केंद्र व राज्य शासना अंतर्गत असलेल्या सर्व विभागातील रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी, तालखेड ते झिंजुर्डी तांडा, व तालखेड ते चाहूर तांडा, तालखेड ते कुरन तांडा, खुळखुळी तांडा रस्त्याचे काम डांबरीकरण करावे, राशन कार्ड प्रकियेतील सर्व कामे तात्काळ करून वंचित असणार्यांना अन्यधान्य योजनेत समाविष्ट करा या प्रमुख मागण्यांना घेऊन हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्हाध्यक्ष मोहन जाधव, एड. सय्यद याकूब, तालुका अध्यक्ष विनायक चव्हाण, तालुका सचिव सुहास झोडगे, शहर अध्यक्ष फारूक सय्यद, रवि राठोड, अनिल राठोड, मधुकर आडागळे, महेबुब शेखे, एकनाथ संक्राते, शेख शफीक, शिवाजी भिसे, इम्रान पठाण, शेख मुस्ताकीम, भगवान पवार, दिनकर जोगडे, रफीक भाई आदी.