बीड तालुक्यात
तुती लागवड करणारे शेतकरी अडचणीत
बीड (रिपोर्टर): बीड तालुक्यासह जिल्हाभरातील अनेक शेतकरी तुती लागवड करून आपला आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न करतात. मात्र प्रशासकीय पातळीवर शेतकर्यांची अडवणूक होऊ लागलीय. बीड तहसील कार्यालयातील ऑपरेटर शेतकर्यांच्या फाईली तात्काळ ऑनलाईन करत नाहीत, त्यांच्याकडून आर्थिक मागणी करत आहे. याकडे तहसीलदार डोके यांनी लक्ष घालून सदरील ऑपरेटर विरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे.
बीड तालुक्यातील अनेक शेतकर्यांनी तुतीची लागवड केली, तुती लागवडीसाठी शासन अनुदान देत आहे, हे अनुदान बीड तहसील कार्यालयातून शेतकर्यांच्या खात्यावर जमा होते. तहसील कार्यालयातील शिंदे नामक ऑपरेटर शेतकर्यांची जाणीवपुर्वक अडवणूक करत आहेत. शेतकर्यांच्या फाईली ऑनलाईन करण्यासाठी आणि मस्टर काढण्यासाठी दुर्लक्ष केले जात आहे. याकडे तहसीलदार डोके यांनी लक्ष घालून तहसीलदारांनी ऑपरेटरविरोधात कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.