जे बोलायचे ते मी स्पष्ट बोलतो लपून कधीच काही ठेवत नाही चेष्टे मध्ये कधी काही बोलूनही असेल तुमच्यासमोर बोललो होतो केव्हाही काळजीनेच बोललो होतो परंतु च्या पाठीमागे कोणाजवळ तुमचे वय झाले असे कधीच म्हटले नाही आणि तुम्ही पंतप्रधान अमित शहा नंतर थेट मी साहेब शिवछत्राच्या देव्हार्यामध्ये तुमचा फोटो आहे जाऊन काढून दाखवा काल परवा तुम्ही म्हणालात माझा फोटो लावायचा नाही नाहीत लावणार तुमचा फोटो परंतु तुमचे आमच्यावर झालेल्या संस्काराचे काय असा सवाल करत माजी आमदार अमरसिंह पंडितांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेत शरद पवारांचा तो वय झालेला मुद्दा खोडून काढत आपण अजित पवारांसोबत का गेलो हे स्पष्टच सांगितले
अमरसिंह पंडित पुढे बोलताना म्हणाले की राज्यात घडलेल्या घडामोडीनंतर अजित दादा तुम्ही प्रथमच बीडमध्ये येत आहात. बीड जिल्हा मुंडेंच्या नेतृत्वात सह्याद्रीच्या पाठीशी आहे. बीड जिल्हा असंख्य प्रश्नांचा जिल्हा आहे हे प्रश्न चर्चेत यावेत हा मूळ उद्देश या सभेचा आहे हा जिल्हा शरद पवार साहेबांच्या पाठीशी कायम उभा राहिलेला जिल्हा आहे. त्यादिवशी साहेबांची सभा बीडमध्ये झाली तब्बल 18 वर्षानंतर साहेब बीडमध्ये असताना आपण तिथे नाहीत याबाबत मनात घालमेल होती. आई भवानीला मी साकडं घालत होतो आता विचित्र काही घडू नये परंतु त्या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा नंतर मी असं म्हणत अमरसिंहांनी वय झालेल्या मुद्द्याला आणि वक्तव्याला हात घातला पुढे बोलताना अमरसिंह म्हणाले आमची निष्ठा पवारांच्या चौकटीवर आहे. आम्ही वेळोवेळी सांगितलं साहेब दोन चौकटी होऊ देऊ नका आम्ही ठरवलं अजित दादा सोबत जायचं. ते केवळ विकासाच्या दृष्टिकोन समोर ठेवून गोदावरी पात्रात बॅरिकेज झाली म्हणून गेवराई तालुक्यात ऊस उत्पादन आणि कापूस उत्पादन वाढली ते सिंचन केवळ दादा मुळेच वाढली साहेब तुम्ही सांगा मी काय चूक केली. तुम्ही पिण्याच्या पाण्याच्या गप्पा मारता इथं आज शेतीला पाणी हवय हा भाग ऊसतोड कामगारांचा भाग आहे किती दिवस आम्ही ऊसतोड कामगाराची लेकर म्हणून आमची ओळख द्यायची आमची इच्छा आहे सिंदफना नदीवर दहा बॅरिगेज झाले पाहिजे पश्चिम वाहिनीचे पाणी बीड जिल्ह्यात येत नाही परंतु नाशिक जिल्ह्याने अडवलेले पाणी तर बीड जिल्ह्याला सोडता येईल ते आमच्या हक्काचे पाणी आम्हाला द्यावे त्यामुळे मराठवाड्याचा पाणी प्रश्न मार्गी लागेल. साहेब सध्या तुमच्या व्यासपीठावरून घर घाले बोलत आहेत आज धनंजय मुंडे तुम्हाला वाईट वाटू लागली कालची शेंबडे पोर तुमच्या व्यासपीठावरून काही बोलतात असा संतापही व्यक्त केला एवढेच नव्हे तर अमरसिंह यांनी शरद पवार यांच्याबाबत साहेब तुमचा फोटो शिवछत्रच्या देव्हार्यात आहे. जा काढून दाखवा तुमच्यात किती ताकद आहे. तुम्ही म्हणालात माझा फोटो लावू नका नाही लावणार मी तुमचा फोटो परंतु तुमचे आमच्यावर झालेल्या संस्काराचे काय असा सवालही त्यांनी यावेळी केला