मनोज जरांगे सलाईनवर; सरकार अस्वस्थ, अध्यादेशाची तयारी
बीड (रिपोर्टर): मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांचे उपोषण सुरुच असून आज त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सलाईन लावण्यात आली आहे तर दुसरीकडे राज्य सरकार अध्यादेश काढण्याच्या तयारीत आहे. बीड जिल्ह्यात शासनाच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. गोविंदवाडीत सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली तर मस्साजोग येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रामपुरीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध करण्यात आला.
रामपुरीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमात्मक पुतळ्याचे दहन मनोज जरांगे पाटलांना दोनशे मोटारसायकलची रॅली काढून पाठींबा
टाकरवण (रिपोर्टर)- गेवराई तालुक्यातील रामपुरी या गावात मराठा आरक्षण विषयी ठोस निर्णय ण घेतल्यामुळे व आंदोलकावर लाठीचार्ज कारायला लावल्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमात्मक पुतळ्याचे दहन सर्व गावकर्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले तसेच रामपुरी गावामधून मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा म्हणून जवळपास दोनशे मोटारसायकलची भव्य अशी रॅली काढून सराटे अंतरवाली मध्ये नेली अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा लढा हा चालू आहे 58 मोर्चे काढले 42 जन मराठा आरक्षणासाठी शहीद झाले .अनेक घर उध्वस्त झाले तरी पण मराठ्यांना आरक्षण मिळत नाही . शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे पेईल तो गुरगुरणारच असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला आहे .आणि त्याच शिक्षणामध्ये आरक्षण शांततेत मागत आहोत.
मराठा शांततेच्या मार्गाने आरक्षण मागतोय परंतु काही समाजकंटकांनी मराठा आरक्षणाला गालबोट लावण्यासारखं कृत्य केले मराठा आरक्षणाला सराटे आंतरवाली येते उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील व सर्व मराठा समाज यांच्यावर पोलीस प्रशासनाने भ्याड हल्ला केला माता भगिनींच रक्त निघालं लहान लहान मुलांना घरात घुसून मारण्यात आलं पाकिस्तानातून पळून आलेल्या सीमा हैदरच्या मुलांची महाराष्ट्रातल्या प्रशासनाला किव येते आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असणार्या मराठा समाजावर
जर हे प्रशासन लाठ्या बंदुकी चालवीत असेल तर हा अन्याय मराठा समाज कदापि सहन करणार नाही. कारण सिंहाच्या जबड्यात घालुनी हात मोजिती दात ही जात मराठ्याची हा महाराष्ट्र चा इतिहास आहे. शाहू. फुले. आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राने देशाला भरभरून दिलेला आहे आणि ह्याच महाराष्ट्रामध्ये जर मराठ्यांच रक्त जर सांडत असेल तर इट का जबाब पत्थर से देण्यासाठी मराठी सज्ज आहेत.
सकल मराठा समाज व लवकरात लवकर आरक्षण नाही मिळाले तर पुढील दिशा लवकरच ठरवू असा सरकार ईशारा सकल रामपुरी येथील मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे .