गेवराई (रिपोर्टर) जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुयू असताना पोलिसांकडून झाकेल्या लाठीचार्ज च्या निषेधार्थ तालुक्यातील गोविंदवाडी येथे आज रोजी राज्य सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.
यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्या फोटोसह सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत गावातून स्मशानभुमीत नेऊन फोटोचे दहन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावातील सर्व महिला भागिणीसह समाज बांधव या अंत्ययात्रा आंदोलनात सहभागी झाले होते.