बीड (रिपोर्टर): मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी आज सकळ मराठा समाजाच्या वतीने परळी तालुक्यातील वाण धरणामध्ये उतरून जलसमाधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये अनेक तरुणांचा सहभाग होता.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत असून तालुक्यासह गावपातळीवर सुद्धा तरुणांनी आंदोलन सुरू केले. परळी तालुक्यातील वाण धरणामध्ये उतरून आज दुपारी बारा वाजता जलसमाधी आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाला सरसकट कुणबीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, लाठीचार्जच्या घटनेचा जाहीर निषेध करत तरुणांनी आंदोलन केले.