बीड (रिपोर्टर): मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. त्यांच्या समर्थनार्थ बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भरपावसात सकळ मराठा शिक्षक, प्राध्यापक, कोचिंग ग्लासेस शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या वतीने धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात शिक्षक, प्राध्यापकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
गेल्या बारा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटे या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी राज्यभरात वेगवेगळ्या पद्धतीने दररोज आंदोलन होत आहे. बीड जिल्ह्यातही ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकळ मराठा शिक्षक, प्राध्यापक, कोचिंग क्लासेस शिक्षक समन्वय समिती व शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. पाऊस सुरू असताना हे आंदोलन सुरूच होते. या आंदोनलात मोठ्या संख्येने शिक्षकांचा सहभाग होता.