उद्याच्या कॅबिनेटमध्ये महत्वकांक्षी खुंटेफळ प्रकल्पाची निविदा
आष्टी उपजिल्हारूग्णालय सह विविध 2 हजार कोटींची विकासकामे लागणार मार्गी – आ.बाळासाहेब आजबे
आष्टी(रिपोर्टर): मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर येथे उद्या कॅबिनेट बैठक मध्ये उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे पत्र देऊन आष्टी विधानसभा मतदारसंघाच्या विविध विकास कामे यामध्ये महत्वाकांक्षी खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्पाची निविदा तसेच आष्टी येथे उपजिल्हारुग्णालय, पाटोदा तालुक्यातील तलाव, आष्टी तालुक्यातील 6 बॅरीकेट , कृषी कार्यालय यांसह विविध 2 हजार रुपयांची विविध विकास कामे मार्गी लागणार असल्याचे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी आज दि.15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता आयोजित आष्टी येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर येथे उद्या कॅबिनेटची बैठक होणार असून उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे आष्टी मतदार संघातील महत्वकांक्षी खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्प, पाटोदा तालुक्यातील उंबरहिरा साठवण तलाव,शिरुर मधील 2 तर आष्टी तालुक्यातील 6 बॅरीकेट बंधारे ,शिरुर येथील भुमी अभिलेख, दुय्यम निबंधक,आष्टी कृषी कार्यालय,आष्टी येथे 50 चे 2 ट्रान्सफॉर्मर बसवणे, 8 दिवसांत लाईट प्रश्न मार्गी लागून पुढील 10 वर्ष तुटवडा जाणवणार नाही.आष्टी मतदार संघात 10 कोटी रुपयांची 112 सभामंडप मंजूर झाले आहेत.उद्याच्या बैठकीत खुंटफळची (पान 7 वर)
घोषणा होऊन आठ दिवसांत निविदा निघेल 2 हजार कोटींची विकासकामे मार्गी लागले तर आपले भाग्यच म्हणावे लागेल कारण आपल्याकडे कॅबिनेट होत असताना ऐवढा मोठा निधी आपल्या मतदारसंघाला मंजुर होत आहे. तर मतदार संघाच्या भल्यासाठी होणार आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे याबाबत सरकारने सकारात्मक रहावे मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे या मताचे आम्ही आहेत असे म्हणाले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष आण्णासाहेब चौधरी, डॉ,शिवाजी राऊत, उपस्थित होते.