बीड (रिपोर्टर): राज्य सरकारच्या वतीने नोकर भरती सुरू आहे मात्र काही नोकर भरती कंत्राटी पद्धतीने केली जात असल्याने यामुळे भविष्यात धोके निर्माण होणार आहेत. कंत्राटी भरती प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आले. या वेळी अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
राज्य सरकार नोकरभरती करत आहे मात्र कंत्राटी बेसवर नोकर भरती प्रक्रिया राबविली जात असल्याने बेरोजगार तरुणांचा नुसता वापर करून घेतला जाऊ लागला. शासकीय नोकरी ही कायमस्वरुपाची असायला हवी, कंत्राटी पद्धत रद्द करण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, मराठवाड्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना दिले आहे.